पुरामुळे बिहारमध्ये 157 जण मृत्युमुखी; कोट्यवधींचे जनजीवन विस्कळित

पीटीआय
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पाटणा: बिहारला पुराचा जोरदार फटका बसला असून, आतापर्यंत 157 जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून, एक कोटी नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

पाटणा: बिहारला पुराचा जोरदार फटका बसला असून, आतापर्यंत 157 जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून, एक कोटी नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

अरारिआ जिल्ह्यात 30 जण मरण पावले असून, पश्‍चिम चंपारण्यात 23, सीतामढी 13, मधुबनी 8 आणि कतिहारमध्ये 7 जण मरण पावले आहेत. पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील किशनगंज आणि सुपुअल येथे प्रत्येकी 11 जण, तर पूर्णिया आणि मधेपुरामध्ये प्रत्येकी 9 जण मरण पावले आहेत. त्याशिवाय दरभंगा, गोपालगंज आणि सहरसा येथे प्रत्येकी चार जण, खगारिया, शेओहर येथे तीन आणि मुझफ्फरपूर येथे 1 जण मरण पावला आहे, अशी माहिती आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरुद्ध कुमार यांनी दिली. 17 जिल्ह्यांतील एक कोटी आठ लाख नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून, एक हजार 688 पंचायतींना या पुराचा फटका बसला आहे, असे ते म्हणाले.

गया, भागलपूर आणि पूर्णिया येथे उद्या (रविवारी) मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: bihar news bihar flood and 157 dead