बिहारमध्ये 'नये दोस्त, नया याराना'

उज्ज्वलकुमार
रविवार, 14 जानेवारी 2018

"दही चुड्या'निमित्त भाजप नितीश यांच्या पंगतीला

पाटणा : बिहारमधील राजकीय समीकरणे बदलताच राज्यातील पारंपरिक "दही चुडा' कार्यक्रमाचे स्वरूपही बदलले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोघेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या वेळेस पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी लालूंना तुरुंगात जावे लागल्याने त्यांच्या घरी अक्षरश: सन्नाटा पसरला आहे. "दही चुडा' कार्यक्रमाचा पारंपरिक रुबाब कायम राहावा म्हणून या वेळेस केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास नितीशकुमार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त उद्या (ता. 14) राज्यामध्ये विविध पक्षांनी कार्यक्रमांचे आयोजन केले असून, यामध्ये संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठनारायणसिंह यांचाही समावेश आहे. नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही विविध ठिकाणांवर तिळगूळ वाटपाचे आयोजन केले आहे. संयुक्त जनता दलाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार हेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपला आमंत्रण
मागील वर्षी सत्तेत भागीदार नसल्याने भाजपला नितीशकुमार यांच्या दही चुडा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले नाही. या वेळेस मात्र समीकरणे बदलल्याने चार वर्षांनंतर भाजपला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते पासवान आणि नितीश यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभामध्ये सहभागी होणार आहेत.

लालू तुरुंगात
लालूप्रसाद यादव दरवर्षी आपल्या निवासस्थानीच भव्य भोजन समारंभ आयोजित करत असत. या वेळेस ते तुरुंगात असल्याने "दहा देशरत्न' मार्गाची पार रया गेली आहे. लालू हे तुरुंगात "दही चुड्या'चा आस्वाद घेतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. राष्ट्रीय जनता दलाचे अनेक कार्यकर्ते दही चुडा घेऊन रांचीतील तुरुंगात दाखल झाल्याचे समजते.

Web Title: bihar news bihar politics and bjp nitish kumar