भाजपने केले शत्रुघ्न सिन्हांना 'खामोश'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पाटणा: चित्रपटांमधून इतरांना "खामोश' करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या भाजप पक्षानेच "खामोश' केले आहे. 14 ऑक्‍टोबरला होणाऱ्या पाटणा विश्‍वविद्यालयाच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असताना, शत्रुघ्न सिन्हांना मात्र या कार्यक्रमापासून दूर ठेवले आहे.

पाटणा विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम उरकून पंतप्रधान मोदी मोकामा जिल्ह्यात एक सभा घेणार आहेत. या सभेदरम्यान ते तीन हजार कोटी रुपयांच्या रस्तेबांधणी योजनेचे उद्‌घाटन करतील. हे सर्व कार्यक्रम पाटलीपुत्र मतदारसंघात होत आहेत. प्रोटोकॉलनुसार, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावणे आवश्‍यक आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणांमुळे त्यांच्या नावावर काट मारण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर नुकतीच जोरदार टीका केली होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांचे जोरदार समर्थन केले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे समजते. पाटणामध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीलाही त्यांना बोलाविण्यात आले नव्हते. पक्ष जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याने शत्रुघ्न सिन्हा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळण्याची शक्‍यता नाही, असाच अर्थ काढला जात आहे.

Web Title: bihar news bjp and shatrughan sinha