शरद यादव गटाची घोषणा हास्यास्पद

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पाटणा : बंडखोर शरद यादव गटाने केलेली पक्षातील पदाधिकारी निवडणुकीची घोषणा हा मोठा विनोद आहे, अशी खिल्ली जनता दलाने (संयुक्त) उडविली.

पाटणा : बंडखोर शरद यादव गटाने केलेली पक्षातील पदाधिकारी निवडणुकीची घोषणा हा मोठा विनोद आहे, अशी खिल्ली जनता दलाने (संयुक्त) उडविली.

निवडणुकीची घोषणा करून यादव गट जनतेत संभ्रम निर्माण करू पाहत आहे, असे पक्षाचे राज्यप्रमुख वशिष्ठ नरेन सिंह यांनी म्हटले आहे. बंडखोर नेते शरद यादव यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली होती. त्यावरून आज त्यांना लक्ष्य करण्यात आले.

सिंह म्हणाले, ""ही घोषणा हास्यास्पद असून, ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातील सर्व आमदार व पदाधिकारी नितीशकुमार यांच्या पाठिशी ठाम आहेत.''

Web Title: bihar news jdu mocks sharad yadav over party elections