लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज "रांची इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'मध्ये भरती करण्यात आले. सध्या डॉक्‍टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, आजच पशुखाद्य गैरव्यवहारातील चौथ्या प्रकरणाची सुनावणी होणार होती; पण तीही लांबणीवर पडली आहे. न्या. शिवपालसिंह हे सुटीवर गेल्याने या प्रकरणाचा निकाल आता सोमवारी जाहीर होऊ शकतो.

Web Title: bihar news lalu prasad yadav health