नितीश यांच्याकडून जनादेशाचा अवमान: तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

पाटणा: राज्यातील जनतेने महाआघाडीला कौल दिला होता, नितीशकुमार यांना त्या जनादेशाचाच अवमान केला आहे. त्यांना भाजपसोबत जायचे होते तर त्यांनी चार वर्षांपूर्वीच हा निर्णय का घेतला नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेत केला. आम्ही राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती; पण ती देण्यात आली नाही. विधानसभाध्यक्षांनीही आमचे म्हणणे ऐकले नाही. भाजपने आदल्या दिवशीच आमदारांना कैद केले होते, असा आरोपही त्यांनी केला.

तेजस्वी म्हणाले की, माझे वय केवळ 28 वर्षांचे असताना मी कोणासमोरही झुकलो नाही, नितीश हे कसलेले खेळाडू असतानाही त्यांनी भाजप आणि संघासमोर गुडघे टेकले. नितीशकुमार यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी आणि गोडसेच्या वंशजांशी हातमिळवणी केली केली.

या वेळी तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी नितीश यांनी मोदींना उद्दैशून सादर केलेली थ्री-इडियट्‌मधील कविताही म्हणून दाखविली.

तेजस्वी बोल

  • सुशील मोदींसोबत बसताना लाज वाटत नाही का?
  • आमच्या पक्षाला सत्तास्थापनेची संधीच मिळाली नाही.
  • गुप्त मतदान घेतले असते, तर निकाल वेगळा लागला असता
  • आमच्या प्रश्‍नांना नितीश, भाजपकडे उत्तरे नाहीत
  • आमच्यामुळेच नितीशकुमार मुख्यमंत्री होऊ शकले
  • लालूंनी नितीश यांना भाऊ मानले होते

ट्विट
नितीशकुमार यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
- तेजस्वी यादव, नेते, राष्ट्रीय जनता दल

याचिकांवरील सुनावणी लांबणीवर
बिहारमधील नव्या सरकारविरोधात पाटणा उच्च न्यायालयामध्ये दोन याचिका सादर करण्यात आल्या असून, यावरील सुनावणी न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. यातील एक याचिका राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सरोज यादव यांनी सादर केली असून, दुसरी समाजवादी पक्षाचे नेते जितेंद्रकुमार यांनी सादर केली. या याचिकांमध्ये सर्वांत मोठा पक्ष या नात्याने राष्ट्रीय जनता दलास सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: bihar news nitish kumar and tejaswi yadav politics