शरद यादवांच्या 'जेडीयू' बरोबर 'राजद'ची आघाडी राहणार: लालूप्रसाद

उज्ज्वल कुमार
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नितीशकुमार यांच्यावर खरमरीत टीका

पाटणा: शरद यादव यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयू) बरोबर राष्ट्रीय जनता दलाची (राजद) आघाडी असेल, असे "राजद'चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालूप्रसादांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात संयुक्त जनता दलात फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत.

नितीशकुमार यांच्यावर खरमरीत टीका

पाटणा: शरद यादव यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयू) बरोबर राष्ट्रीय जनता दलाची (राजद) आघाडी असेल, असे "राजद'चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालूप्रसादांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात संयुक्त जनता दलात फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत.

नवीन पक्ष स्थापन करण्याचा आपला विचार नसल्याचे शरद यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या सत्तेतील बदलांमुळे पक्षाचे माजी अध्यक्ष असलेले शरद यादव नाराज आहेत. येत्या 17 ऑगस्टला त्यांनी नवी दिल्लीत "धर्मनिरपेक्षता' यावर चर्चासत्र आयोजित केले आहे.

लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की, नितीशकुमार हे भाजपची "बी' टीम झाले आहेत. शरद यादव यांनी स्थापन केलेला संयुक्त जनता दल हा खरा पक्ष असून, त्यांच्या पक्षाबरोबर आघाडी कायम राहील. खरा कार्यकर्ता शरद यादव यांच्याबरोबरच असून, त्यांच्याबरोबर आणि कॉंग्रेसबरोबर आमचे नाते राहील.

लालूप्रसाद म्हणाले,""शरद यादव बिहारमध्ये आल्यावर त्यांच्यावर बाटल्या, अंडी आणि काठ्या फेकण्याची तयारी नितीशकुमार यांनी केली आहे. स्वतः केलेल्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी नितीशकुमार कोणत्याही थराला जाऊ शकतात. लोकांचा आवाजही बंद करण्याची त्यांचा प्रयत्न आहे.'' नितीशकुमार यांनी जनादेशाचा अपमान केला आहे. त्याच्या विरोधात तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी चंपारण्य येथे काढलेल्या मिरवणुकीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचा दावा लालूप्रसाद यांनी केला.

नितीश झाले "पलटू राम'
नितीशकुमार यांच्यावर तीव्र टीका करताना, नितीशकुमार हे राजकारणातील "पलटू राम' झाल्याचा पुनरुच्चार लालूप्रसाद यांनी केला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेखाली उभे राहून त्यांनी संघमुक्त भारताची घोषणा केली होती. आता तेच संघाच्या कुशीत जाऊन बसले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: bihar news sharad yadav jdu and laluprasad yadav