तेजप्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाला सील

उज्ज्वलकुमार
शुक्रवार, 21 जुलै 2017

न्यायालयाच्या आदेशानंतर भारत पेट्रोलियमची कारवाई

पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाला आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सील केले. पेट्रोल पंप रद्द करण्याबाबत गुरुवारी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कंपनीने ही कारवाई केली.

तेजप्रताप यांनी बनवेगिरी करून पाटणाच्या बेऊर भागात हा पेट्रोल पंप घेतला होता. तेजप्रताप यांना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात त्यांना हा परवाना दिला होता. तेजप्रताप यादव यांनी बनवेगिरी करून दुसऱ्याची जमीन आपली असल्याचे सांगून भारत पेट्रोलियमकडून हा पेट्रोल पंप मिळविला, असा आरोप भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.

त्यानंतर भारत पेट्रोलियमने या प्रकरणाची चौकशी करून हा पेट्रोल पंप रद्द केला होता. पेट्रोल पंप रद्द करण्याच्या आदेशाला न्यायाधीश श्रीमती एस. मिश्रा यांनी यापूर्वी स्थगिती दिली होती. मात्र, गुरुवारी ही स्थगिती मागे घेण्यात आली. त्यामुळे आरोग्यमंत्री तेजप्रताप यांचा पेट्रोल पंप परवाना रद्द होणार, असे मानण्यात येत आहे.

लालूपुत्रांना हटविण्याची मागणी
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात असलेले लालूपुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी जोरदारपणे करण्यात येऊ लागली आहे. नितीशकुमार आता कशाची वाट पाहत आहेत, अशी विचारणा सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे.

Web Title: bihar news tejpratap yadav Petrol Pump Seal