Bihar: IPL जिंकण्याचं स्वप्न पाहणारा तेजप्रताप यादव आज बिहारचा फडणवीस ठरतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejashwi Yadav

Bihar: IPL जिंकण्याचं स्वप्न पाहणारा तेजप्रताप यादव आज बिहारचा फडणवीस ठरतोय

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नितीश-तेजस्वी सरकारमध्ये सर्व डील फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहतील तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय देण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे. बिहारमधील आजवरच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद मुख्यमंत्री व्यतिरिक्त इतर कुणाला दिलं जाण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.(Bihar Political Crisis Tejashwi Yadav will be Deputy Chief Minister education political career)

मुख्यमंत्री नितीश कुमार कोणत्याही क्षणी भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत चूल मांडू शकतात. भाजपाला सोडचिठ्ठी देत महागठबंधनमध्ये आल्यावरही बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारच राहतील अशी माहिती असतानाच तेजस्वी यादव हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य तेजस्वी यांचे मामा प्रभुनाथ यादव यांनी खळबळजनक वक्तव्य केल आहे.

लालू यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1989 रोजी झाला होता. क्र‍िकेटरमध्ये करिअर करताना त्यांचं शिक्षण मात्र मागेच राहिलं. 2015 मध्ये ते दीड वर्षे नितीश कुमार सरकारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री होते.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा लहान मुलगा तेजस्वी यादव वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी बिहारचे उपमुख्यमंत्री झाले होते. राजकारणात येण्याआधी ते क्र‍िकेट क्षेत्रात आपलं नशिब आजमावत होते. त्यांनी विजय हजारे चषकात झारखंडचं प्रतिनिध‍ित्वही केलं होतं.

तेजस्वी 2008 ते 2012 पर्यंत 4 वर्षे दिल्ली डेअरडेविल्स आयपीएल टीमचा भाग होते. मात्र, त्यांना आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी थेट संसदेतही केला होता. तेजस्वी यांना खेळण्याची संधी देण्याऐवजी इतर खेळाडूंना पाणी बॉटल देण्यास सांगितले जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती.

श‍िक्षणाबाबत तेजस्वी आपले वडील लालू प्रसाद यादव यांच्या खूप मागे आहेत. लालू यादव यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय. मात्र, तेजस्वी केवळ 9 वी पास आहेत. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली होती. त्यांचे भाऊ तेजप्रताप हे 12 वी पास आहेत.

तेजस्वी यांना क्र‍िकेटमध्येच आपलं करिअर करायचं होतं. मात्र, लालू प्रसाद चारा घोटाळ्याच्या आरोपांखाली तुरुंगात गेल्यानंतर तेजस्वी यांची राजकारणात चर्चा होऊ लागली.

तेजस्वी यादव पहिल्यांदा 2015 मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर राघोपूर मतदारसंघातून निवडून आले. यानंतर ते नितीश सरकारमध्ये नोव्हेंबर 2015 आणि जुलै 2017 मध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री झाले.