esakal | मतपेढीसाठीच शेवटची ‘खेळी’
sakal

बोलून बातमी शोधा

Political Cricket-Match

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्‍यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट गोड, तर सर्व गोड’ असे सांगत मतदारांना भावनिक साद घातली. बिहारच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे नितीश कुमार यांच्या या धक्कादायक खेळीचा संबंध राजकीय विश्‍लेषक शेवटच्या टप्प्यातील मतदानाशी जोडत आहेत.

मतपेढीसाठीच शेवटची ‘खेळी’

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पूर्णिया (बिहार) - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्‍यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट गोड, तर सर्व गोड’ असे सांगत मतदारांना भावनिक साद घातली. बिहारच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे नितीश कुमार यांच्या या धक्कादायक खेळीचा संबंध राजकीय विश्‍लेषक शेवटच्या टप्प्यातील मतदानाशी जोडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंतिम टप्‍प्यात ज्या ७८ जागांसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे, त्यातील सर्वाधिक जागा सध्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयू)कडे आहेत. २०१५ मध्ये महाआघाडीचा घटक पक्ष असताना ‘जेडीयू’ने या मतदारसंघातून २३ जागांवर विजय मिळविला होता. राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)ला २०, काँग्रेसला ११ व भाजपला २० जागा मिळाल्या होत्या. उद्या ज्या मतदारसंघातील ७८ जागांसाठी मतदान होणार आहे, तेथे अतिमागास, मुसलमान आणि यादव समाजाची संख्या अधिक आहे. अतिमागास वर्गीय हे नितीश कुमार यांचे मतदार आहेत. काल भावनिक आवाहन करून कुमार यांनी या वर्गाची मतपेढी आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

निवृत्तीवेतनात निम्म्याहून अधिक कपात; केंद्राकडून लष्कराच्या मनोधैर्याचे खच्चीकरण?

नाराज मतदार साथ देणार का?
बिहारमध्ये सरकारविरोधी लाटेमुळे या वेळी नितीश कुमार यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसली. अशा वेळी भावनिक खेळीने ते मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालाच्या दिवशीच समजेल.

उमर खालिदला झटका; UAPA अंतर्गत खटला चालवण्यास केजरीवाल सरकारची मंजूरी

मुस्लिमांना दिलासा
नितीश कुमार यांनी किशनगंज येथील प्रचारसभेत ‘कोणातही एवढी हिंमत नाही की जो आमच्या लोकांना देशाबाहेर घालवून देईल.’ याचा संदर्भ उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्या विधानाशी असला तरी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत सीमांचलचा समावेश आहे आणि हा भाग मुस्लिम बहुल आहे. नितीश कुमार यांच्या दिलाशामुळे मुस्लिम मते ‘एनडीए’च्या खात्यात येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. नितीश कुमार भाजपबरोबर असले तरी मुस्लिमांनी ‘जेडीयू’ला कायम साथ दिली आहे.

भाजप नेत्यासह कार्यकर्त्यांना अटक; राज्य सरकारचा आदेश धुडकावत काढली यात्रा

विरोधकांनी केले लक्ष्य...

  • तेजस्वी यादव (राष्ट्रीय जनता दल) - नितीश कुमार थकले आहेत. त्यांना बिहार सांभाळणे शक्य होत नाही, हे आम्ही सांगत होतो. 
  • उपेंद्र कुशवाह - राजकारण सोडून त्यांनी आराम करावा.
  • काँग्रेस - नितीश कुमार यांनी यापूर्वीच निवृत्त व्हायला हवे.

Edited By - Prashant Patil