esakal | दहा राज्यांत बर्ड फ्लू; दिल्ली, महाराष्ट्रातही लागण
sakal

बोलून बातमी शोधा

दहा राज्यांत बर्ड फ्लू; दिल्ली, महाराष्ट्रातही लागण

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे २०० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. डेहराडूनच्या विविध भागात १६५ पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यात भंडारी बाग येथील १२१ कावळ्यांचा समावेश आहे.

दहा राज्यांत बर्ड फ्लू; दिल्ली, महाराष्ट्रातही लागण

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - देशातील दहा राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असून नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातही संसर्गाला दुजोरा मिळाला आहे. दिल्लीत डेव्हलपमेंट ॲथोरिटीच्या वेगवेगळ्या पार्कमध्ये काल ९१ कावळे आणि २७ बदकाचा मृत्यू झाला आहे. संजय लेक परिसरात दक्षतेचा इशारा दिला आहे. 

राजस्थानच्या सिरोही आणि प्रतापगड येथून पाठवलेल्या नमुन्यात बर्ड फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्पूर्वी जयपूर, दौसा, सवाई माधोपूर, हनुमानगड, बिकानेर, चित्तोडगड, पाली, बारा, कोटा, बांसवाडा येथेही नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मध्य प्रदेशातील १८ जिल्ह्यात संसर्गाचा फैलाव झाला आहे. निवाडी जिल्ह्यातील सोरका गावात दोन दिवसांपूर्वी २४ दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळून आले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे २०० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. डेहराडूनच्या विविध भागात १६५ पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यात भंडारी बाग येथील १२१ कावळ्यांचा समावेश आहे. तर ऋषिकेश येथे आणि परिसरात ३० अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात २८ कावळ्यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये बर्ड फ्लूमुळे खबरदारी घेतली जात असून राज्यातील अभयारण्य आणि पक्षी अभयारण्याला नागरिकांनी भेट देऊ नये, असे आवाहन उत्तर प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे. अनैसर्गिक मृत्यूची तत्काळ सूचना देण्याचे खात्याने सांगितले आहे. हिमाचलच्या पॉंग धरण क्षेत्रात रविवारी २१५ स्थलांतरित पक्षी मृत झाल्याचे उघडकीस आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाधित राज्य: नवी दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाना, गुजरात

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील बर्ड फ्लूची स्थिती
नवी दिल्ली : भोपाळला पाठवलेले ८ नमुने पॉझिटिव्ह
नवी दिल्ली: गाझीपूरचा पोल्ट्री बाजार तात्पुरता बंद
उत्तराखंड: डेहराडून परिसरात सुमारे २०० पक्ष्यांचा मृत्यू
ऋषिकेश परिसरात ३० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू
अहमदाबाद: सुरत आणि बडोदा येथील नमुने पॉझिटिव्ह
अहमदाबाद: बडोद्यातील किया गावात ५७ कबुतरांचा मृत्यू

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image