दिल्लीच्या प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांना बर्ड फ्लू

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात येथील प्राणी संग्रहालयातील काही पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्राणी संग्रहालय खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्याचे प्राणी संग्रहालयाच्या सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ प्राणी, पक्षी, काही बदके आणि काही पेलिकन पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत हे प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मरण पावलेल्या काही बदकांचे नमुने आम्ही जालंधर आणि मथुरेला तपासणीसाठी पाठविले असून, त्याबाबतचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे, असे प्राणी संग्रहालयाच्या सूत्रांनी सांगितले.

भारत बर्ड फ्लूमुक्त झाल्याचे गेल्या महिनाभरापूर्वीच जाहीर केले होते. या बर्ड फ्लूचा माणसांवर परिणाम होत नसल्याचे प्राणी संग्रहालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून ते बंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राणी संग्रहालयाच्या चमूने नुकतीच येथे पेलिकन आणि बदकांच्या भागात भेट देऊन पाहणी केली. वर्षभरापासून या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात विविध कारणांस्तव प्राणी मरण पावत आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत 46 हरणांचा येथे मृत्यू झाला आहे.

Web Title: birds bird flu in zoo

टॅग्स