कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वाढदिवसाचे गिफ्ट

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले असून, त्यांनी पटियाला मतदारसंघातून तब्बल 51 हजारांनी मतांनी विजय मिळविला. 

पटियाला - पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले असून, त्यांनी पटियाला मतदारसंघातून तब्बल 51 हजारांनी मतांनी विजय मिळविला. 

कॅप्टन अमरिंदरसिंग त्यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पटियाला व लाम्बी या दोन मतदार संघातून निवडणुक लढवली होती. त्यापैकी लाम्बी मतदारसंघामध्ये प्रकाश सिंग बांदल यांच्याकडुन त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तर, पटियाला मतदारसंघातून त्यांनी 51000 मतांनी विजय मिळवला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार हे सुरुवातीपासुनच दिसत होते. काँग्रेस आता पंजाबमध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. पंजाबमधील काँग्रेसच्या या यशाचे शिल्पकार कॅप्टन अमरिंदर सिंग ठरले आहेत.   

Web Title: Birthday gift to Amarinder singh