बर्थडे गिफ्ट काय हवं? पंतप्रधान मोदींनी सांगितली Wish List

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 18 September 2020

पंतप्रधानांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या होत्या. या आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मोदींनी आभार मानलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी 17 ऑगस्टला 70वा वाढदिवस होता. यावेळी पंतप्रधान मोदींना देशातील नेत्यांसह जगाभारतील अनेक नेत्यांकडून शुभेच्छा आल्या होत्या. राजकारण, क्रीडा, कला, चित्रपट, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासह सर्व स्तरातील लोकांनी पंतप्रधान मोदींना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच अनेक देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पंतप्रधानांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या होत्या. या आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मोदींनी आभार मानलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा-
वाढदिवसाला भेट म्हणून काय हवं ते पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. याबद्दल त्यांनी लिहिलं आहे की, 'माझ्या वाढदिवशी मला बर्‍याच लोकांनी मला काय हवे आहे हे विचारले असल्याने मी येथे ज्या गोष्टी मला पाहिजे त्या गोष्टी सांगत आहे.'  पंतप्रधानांनी त्यांच्या असणाऱ्या इच्छांची एक यादीचा मा़ंडली -

1. सर्वांनी मास्क घातला पाहिजे.
2. सर्वांनी सोशल डिस्टंसिंग ठेवावं.
3.गर्दीत जाणं टाळा.
4. तुमची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा
5. आपण सर्वजण मिळून संपुर्ण जग निरोगी करुया. 

 पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले-
 तसेच पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्विट केलं आहे ज्यात पंतप्रधान मोदींनी देश-विदेशातील सर्व लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केले की, 'देशभर आणि जगभरातील लोकांनी मला काल शुभेच्छा दिल्या. ज्यांनी माझे अभिनंदन केले त्या सर्वांचे मी आभारी आहे. 

हे वाचा - हरसिमरत कौर होत्या मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा

 

 भाजपने 'सेवा सप्ताह' साजरा केला-
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपने देशभरात 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा केला आहे. यावेळी, पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोककल्याणकारी कार्यक्रम आयोजित केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birthday gift Prime Minister Modi said Wish List