#HBDayAmitShah मोदींनी दिल्या अमितभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले

टीम ईसकाळ
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 54वा वाढदिवस! भाजपच्या संघटनेसह देशातील अनेक महत्त्वाकांक्षी निर्णयांचे ते भागीदार आहेत.

नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 54वा वाढदिवस! भाजपच्या संघटनेसह देशातील अनेक महत्त्वाकांक्षी निर्णयांचे ते भागीदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाल उजवा हात व भाजपतील करारी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या अमित शहांवर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून अमित शहांना शुभेच्छा देत म्हणले आहे की, "कर्मठ, अनुभवी, कुशल संघटक व मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शहांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतानाच ते भारताना सशक्त व सुरक्षित करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो.'' असे ट्विट मोदींनी केले आहे.

अमित शहांच्या वाढदिवसानिमित्त #HBDayAmitShah, गृह मंत्री, Mota Bhai हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birthday wishes to Amit Shah on his birthday