MD अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर 24 तासांतच विद्यार्थ्याची आत्महत्या; तलावात आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Hardik Raiyani

गेल्या तीन दिवसांत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.

MD अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर 24 तासांतच विद्यार्थ्याची आत्महत्या

अहमदाबाद : बीजे मेडिकल कॉलेजमध्ये (BJ Medical College) शनिवारी एमडी अभ्यासक्रमासाठी MD (Medicine) Course प्रवेश घेतलेल्या एका वैद्यकीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती अहमदाबाद ग्रामीण पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. गेल्या तीन दिवसांत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. 8 मार्च रोजी पालनपूर आणि वडनगर मेडिकल कॉलेजमध्ये दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.

अहमदाबाद ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुरतमधील रहिवासी असलेला डॉ. हार्दिक रैयानी (वय 25) Dr. Hardik Raiyani याचा मृतदेह गुरुवारी सकाळी अहमदाबाद जिल्ह्यामधील ढोलका तालुक्यातील (Dholka taluka) सैज गावात (Saij Village) तलावात आढळून आला. असरवा सिव्हिल हॉस्पिटल (Asarwa Civil Hospital) कॅम्पसमधील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिन कोर्सला प्रवेश मिळाल्यानंतर, 24 तासांच्या आतच रैयानी यानं आत्महत्या केलीय. शनिवारी त्याला प्रवेश मिळाला होता आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये ड्युटीला तो हजर झाला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: 'आप' राष्ट्रीय पक्ष होणार? पक्षाला करावी लागणार आयोगाची 'ही' अट पूर्ण

रैयानी बेपत्ता झाल्यानंतर, शहरातील शाहीबाग पोलिस ठाण्यात (Shahibaug police station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अहमदाबादचे ग्रामीण एसपी वीरेंद्र यादव म्हणाले, याबाबत ढोलका ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. बीजे मेडिकल कॉलेजच्या सूत्रांनी सांगितलं की, रैयानी याला वडोदरा मेडिकल कॉलेजमध्ये (Vadodara Medical College) पीजी मेडिसिन कोर्सला गेल्या वर्षी प्रवेश मिळाला होता. रैयानीनं यावर्षी पुन्हा NEET (National Eligibility-cum Entrance Test) दिली आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या एका सहकाऱ्यानं सांगितलं, की रैयानी हा एमबीबीएस अभ्यासक्रमात माझा वर्गमित्र होता. त्याच्या वडिलांचा 2010 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. त्याची आई गृहिणी आहे आणि तो एक हुशार विद्यार्थी होता, असं तो म्हणाला. दरम्यान, मृतदेहाजवळ सुसाईड नोट किंवा मोबाईल फोन सापडला नाही. केवळ तिथं आम्हाला त्याचं कॉलेज ओळखपत्र सापडलं, त्याद्वारे आम्ही त्याच्या वर्गमित्रांशी संपर्क साधला, असं पोलिसांनी सांगितलंय.

Web Title: Bj Medical College Student Commits Suicide Dholka Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top