आयोगाआधी भाजपने केली कर्नाटकची तारिख जाहीर

मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली- केंद्रिय निवडणुक आयोगातर्फे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्यापूर्वीच भाजपच्या अमित मालवीय यांनी ट्विटरवर निवडणुकीची तारीख जाहीर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल असे निवडणुक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

आज सकाळी केंद्रिय निवडणूक आयोगातर्फे कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या घोषणेसाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असतानाच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर निवडणूक तारखांची घोषणा केली. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होईल, असं ट्विट त्यांनी केलं. निवडणुक आयोगाने तारीख जाहीर करण्यापुर्वीच अमित मालवीय यांनी केलेल्या ट्विटवर लोकांनी जाब विचारल्यानंतर काही वेळातच हे ट्विट डिलीट करण्यात आले. 

निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या प्रकाराबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, हे प्रकरण गंभीर असुन याची चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्य निवडणुक आयुक्तांनी सांगितले. 

Web Title: BJP’s Amit Malviya tweets Karnataka poll dates before announcement