रजनीकांत-पूनम महाजन भेटीने चर्चेला उधाण

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे भाजपकडून स्पष्ट केले जात असले तर रजनीकांत भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. तमिळनाडूत बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला सुपरस्टार रजनीकांतच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत करायचा आहे

चेन्नई - तमिळनाडूत भाजयुमोच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी रविवारी अभिनेते रजनीकांत यांची भेट घेतली. ही भेट रजनीकांत यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीमागे राजकीय हेतू असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असताना भाजप सूत्राने मात्र उभयतांची भेट औपचारिक असल्याचे म्हटले आहे.

पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे भाजपकडून स्पष्ट केले जात असले तर रजनीकांत भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. तमिळनाडूत बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला सुपरस्टार रजनीकांतच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत करायचा आहे.

यादरम्यान, भाजपचे उमेदवार वेंकय्या नायडू यांची उपरराष्ट्रपती निवड झाल्यानंतर रजनीकांत यांनी ट्‌विटरवर अभिनंदन केले होते. तसेच परंतु रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर रजनीकांत यांनी अभिनंदन केले नव्हते. यावरून कोविंद यांच्या उमेदवारीवरून रजनीकांत नाराज आहेत का? यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला गेला.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: BJP’s Poonam Mahajan meets Rajinikanth at his residence