जेडीएसशी युती करून काँग्रेसकडून लोकशाहीची हत्या : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

येडियुरप्पांच्या शपथविधीवर राहुल गांधींनी निशाणा साधला. राहुल गांधींनी ट्विटरवरुन केलेल्या शाब्दिक हल्ल्याला अमित शहांनी ट्विटरवर जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपकडून पोकळ विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याचे दु:ख आहे. 

बंगळुरु : ''ज्यावेळी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने कर्नाटकच्या कल्याणासाठी नाहीतर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जेडीएसला पाठिंबा दिला, असेही ते म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून प्रयत्न केले जात होते. त्यानंतर भाजपने वेगवान हालचाली करत कर्नाटक भाजपचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याने काँग्रेस आणि जेडीएसचे नेत्यांनी विधानसभेबाहेर आंदोलन केले. 

येडियुरप्पांच्या शपथविधीवर राहुल गांधींनी निशाणा साधला. राहुल गांधींनी ट्विटरवरुन केलेल्या शाब्दिक हल्ल्याला अमित शहांनी ट्विटरवर जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपकडून पोकळ विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याचे दु:ख आहे. 

Web Title: BJP Amit Shah Criticizes Congress And Rahul Gandhi