आता काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास बसलाः अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये पूर्ण बहूमत कोणत्याही पक्षाला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार केला असून, जनता त्यांच्यावर नाराज आहे. काँग्रेस-जेडीएसने आनंदाचे कारण स्पष्ट करावे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यावर आता काँग्रेसला ईव्हीएम, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगही चांगले वाटू लागले आहे, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत काँग्रेस व जेडीएसवर टीका करताना शहा म्हणाले, कर्नाटकमध्ये बहुमत आम्हालाच असून, सरकार स्थापन करण्यासाठी दावेदारही आम्हीच होतो. काँग्रेस-जेडीएस आज आनंदोत्सव साजरा करत आहे. परंतु, कोणत्या गोष्टीबद्दल आनंद साजरा करत आहेत. पूर्वीपेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या असून, मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी आनंदाचे कारण स्पष्ट करावे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा भ्रष्टाचार केला असून, जनता त्यांच्यावर नाराज आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे. मोदी सरकारने कर्नाटकसाठी मोठे काम केले असून, तेथील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून केलेल्या मतदानाबद्दल आभारी आहोत.'

भाजपने काँग्रेसकडून 14 राज्ये खेचून घेतली असून, भाजपने फक्त नऊ पोटनिवडणूका गामवल्या आहेत. यामुळे 14 राज्य महत्त्वाची की नऊ पोटनिवडणूका महत्त्वाच्या हे काँग्रेसने सांगावे, असा टोला शहा यांनी लगावला.

Web Title: bjp amit shah press conference about karnataka election