'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम आदमी पक्षाचे पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कारापूरकर यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच आप गोव्यात लोकसभा लढविणार असल्याचेही ते म्हणाले.  

आप पदाधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा व दक्षिण गोव्याचे उमेदवार म्हणून आपचे राज्य निमंत्रक एल्वीस गोम्स नाव घोषित करण्याचा ठराव मंजूर झाला, अशी माहिती आपचे प्रवक्ते राॅडनी आल्मेदा यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कारापूरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

कारापूरकर म्हणाले, की ''भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची धोरणे समान आहेत. कोळसा व्यवहार काँग्रेसने सुरु केला होता. भाजप तो आता पुढे नेत आहे. मोपा विमानतळाची सुरवातही काँग्रेसने केली होती. भाजप आता मोपा विमानतळाचे काम पुढे नेत आहे. 

दरम्यान, गोव्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेच्या निवडणूक झाल्यास या निवडणुकींना सामोरे जाण्यास आप तयार आहे. मात्र, आप आपली रणनीती नंतर जाहीर करणार आहे, असे कारापूरकर यांनी सांगितले. 

Web Title: BJP and Congress are two sides of the coin says Aam Aadmi Party Leader Karapurkar