भाजप-आरएसएसचा मला मारण्याचा कट : तेज प्रताप यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वैशाली : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते व लालु प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचा एका शस्त्रधारी माणसाने हात खेचला. हा प्रकार त्यांच्या महुआ येथील विधानसभा मतदारसंघात ते नागरिकांची भेट घेत असताना घडला. 'भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मला हा मारण्याचा कट होता,' असा आरोप तेज प्रताप यांनी केला आहे.

'या शस्त्रधारी माणसाने माझा हात पकडला व काही केल्या तो सोडत नव्हता. आमदार, खासदार, मंत्री जर या राज्यात सुरक्षित नसतील, तर सामान्य माणूस इथे कसा सुरक्षित राहिल,' असा सवालही त्यांनी केला. हा शस्त्रधारी माणूस लोकांच्या गर्दीतूनच आला होता, हात पकडल्यानंतर तेज प्रताप यांच्या वाहनचालकाने आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. 

यापूर्वीही तेज प्रताप यांनी भाजपवर त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केला होता. पण भाजपचे सरकार सत्तेत असल्याने माध्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यातस आल्याचे प्रताप यांनी सांगितले.  

Web Title: BJP and RSS create conspiracy to kill me said tej pratap yadav