भाजप, संघातही दहशतवादी: सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आण‌ि बजरंग दलातही दहशतवादी आहेत. या संघटनांचे काम दहशतवादी संघटनांसारखेच आहे. बजरंग दल, संघ, विश्व ह‌िंदू परिषद, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यासारख्या संस्थांनी समाजात धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरविण्याच्या प्रयत्न करत आहेत.

बंगळूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्यावर पलटवार करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आण‌ि बजरंग दलामध्येही दहशतवादी आहेत, असा खळबळजनक आरोप केला.

सिद्धरामय्या म्हणाले, की भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आण‌ि बजरंग दलातही दहशतवादी आहेत. या संघटनांचे काम दहशतवादी संघटनांसारखेच आहे. बजरंग दल, संघ, विश्व ह‌िंदू परिषद, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यासारख्या संस्थांनी समाजात धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरविण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र, तो कदाप‌ि सहन केला जाणार नाही. 

यावर्षी कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सिद्धरामय्या यांच्या आरोपाबाबत भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अमित शहा यांनी नुकतेच काँग्रेस मतांचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. 

Web Title: BJP and RSS members are like terrorists says CM Siddaramaiah