Breaking : 'या' दोन बड्या नेत्यांना राज्यसभेचं तिकीट; काकडेंना भाजपचा दणका!

वृत्तसंस्था
Wednesday, 11 March 2020

गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याबाबत राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी दिल्ली वारी केली होती. त्यामुळे उदयनराजेंना राज्यसभेची दारे उघडली जातील, याची दाट शक्यता तेव्हापासूनच वर्तविली जात होती.

नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर भाजपने एकापाठोपाठ एक धडाडीचे निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यसभा निवडणुका होणार असून भाजपने आपली पहिली यादी बुधवारी (ता.११) जाहीर केली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भाजपने आपल्या उमेदवारांची नावे आज पहिल्या यादीतून प्रसिद्ध केली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला चीतपट करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

No photo description available.

- काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले 'ते' नेते सध्या काय करतात?

महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या दोन नेत्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि मित्रपक्ष आरपीआय (ए) चे नेते रामदार आठवले यांचा समावेश आहे. भाजपतर्फे ९ जणांना, तर मित्रपक्षातील दोघांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Image may contain: text

गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याबाबत राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी दिल्ली वारी केली होती. त्यामुळे उदयनराजेंना राज्यसभेची दारे उघडली जातील, याची दाट शक्यता तेव्हापासूनच वर्तविली जात होती.

- ज्योतिरादित्यांमुळं आता संपूर्ण शिंदे कुटुंब भाजपमध्ये; आजीने रचला होता पाया 

परिणामी, पुण्यातील भाजपचे बडे नेते आणि राज्यसभा खासदार संजय काकडे आणि अमर साबळे यांना भाजपने दणका दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत काकडेंना नारळ दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announced first list of party candidates for upcoming Rajya Sabha Election 2020