भाजप कडून 18 उमेदवार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीतील 18 उमेदवारांची नावे आज भाजपने जाहीर केली. यामध्ये सिक्कीमच्या 12 तर अरुणाचल प्रदेशच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपकडून आतापर्यंत अरुणाचल प्रदेशातील 54 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या राज्यामधील विधानसभा व लोकसभा निवडणूक 11 एप्रिल ला एकाच वेळी पार पडणार आहेत.

अरुणाचल प्रदेशात नॅशनल पिपल पार्टी (एनपीपी) आणि भाजप या दोन पक्षांचे मिळून सरकार आहे. परंतु, या विधानसभा निवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप मधील दोन मंत्री आणि 16 आमदार असे एकूण 18 सदस्य एनपीपी मध्ये सहभागी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचे राजकिय परिस्थितीवर संपुर्ण प्रभुत्व आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीत आम्ही कोणासोबतही युती करणार नसून भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही. असे मत एनपीपीचे महासचीव व अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री थॉमस संगमा यांनी पत्रकार परिषदेत  व्यक्त केले.

सिक्कीम मध्ये सिक्कीम डेमोक्रेटीक फ्रन्ट (एसडीएफ) या पक्षाचे सरकार असून मुख्यमंत्री पवन चामलिंग पक्षावर पुर्ण नियंत्रण आहे. सिक्कीम विधानसभे मध्ये एकूण 32 जागा असू त्यातील 23 जागा एसडीएफ या पक्षाला तर 9 जागा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) या पक्षाकडे आहेत. 

Web Title: BJP announces 18 candidates for Arunachal Pradesh Assembly election