Vidhan Sabha 2019 : भाजपची विधानसभेसाठी 59 उमेदवारांची यादी जाहीर

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

महाराष्ट्र विधानसभेसोबत हरियाणा राज्याच्याही विधानसभेच्या निवडणुका होत असून भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी पहिल्या 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली :  महाराष्ट्र विधानसभेसोबत हरियाणा राज्याच्याही विधानसभेच्या निवडणुका होत असून भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी पहिल्या 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने काल (ता.29) विविध राज्यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. तर आज (ता.30) भाजपाकडून हरियाणा विधानसभेसाठी होणाऱ्या निवडकीसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे.  भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री उशिरा पार पडली या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. महाराष्ट्रातली काही नावे अंतिम व्हायची राहिली असली तरी हरियाणामधील नावांची यादी मात्र घोषित करण्यात आली आहे.

हरियाणा विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष हा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्ट्रर यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही यादी अंतिम करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

यादी खालीलप्रमाणे

No photo description available.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announces list of 59 candidates for haryana Vidhan Sabha