राममंदिरासाठी पाठिंब्याचे भाजपचे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राममंदिर निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही आता इतर पक्षांना ""हिंदूंच्या भावनांचा आदर करून राममंदिराला पाठिंबा द्या'', असे आवाहन सोमवारी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी करावी, अशी मागणी केली आहे. 

लोकसभेमध्ये प्रश्‍नोत्तराच्या काळात भाजप खासदार गणेशसिंह यांनी राममंदिरासाठी पाठिंब्याचे आवाहन करताना अन्य राजकीय पक्षांना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची आठवण करून दिली.

स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. महात्मा गांधींनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली होती.

आज देशात राम मंदिराच्या निमित्ताने पुन्हा तशी संधी चालून आली असून सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंच्या श्रद्धेचा आदर करताना अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पाठिंबा द्यावा. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची वेगाने सुनावणी करून निकाल द्यावा. एखाद्या व्यक्तीसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत असेल तर राममंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे यावर त्वरित निकाल द्यावा, अशी मागणी गणेशसिंह यांनी केली.

Web Title: BJP appeals for Support from allies for Ram Mandir construction