कर्नाटकचा काँग्रेसला पुन्हा 'हात'; भाजपला मोठा झटका

कर्नाटकचा काँग्रेसला पुन्हा 'हात'; भाजपला मोठा झटका

बंगळूरु : कर्नाटक विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला मोठा यश मिळताना दिसत आहे. पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले असून काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे.

जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार न्यामगौडा यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर, जेडीएसच्या अनिता कुमारस्वामी यांनी रामनगर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या बळ्ळारी लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या उग्रप्पा यांनी विजय मिळवला आहे, तर मंड्या लोकसभा मतदारसंघातून जेडीएसच्या शिवरामगौडा या आघाडीवर आहेत. भाजपाचे बी. वाय. राघवेंद्र हे केवळ शिमोगा लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज (ता. 06) सकाळी सुरवात झाली. शनिवारी (ता. 03) या जागांसाठी मतदान झाले होते. एकूण 5 जागांपैकी सत्ताधारी काँग्रेस-जनता दल सेक्युलर चार जागांवर तर भाजपाचा एका जागेवर विजय निश्चित आहे. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा होती. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली होती. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com