भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : अरुणाचल आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची घोषणा आज (रविवार) करण्यात आली. अरुणाचल प्रदेश 54 तर आंध्रप्रदेशमधील 123 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.

विधानसभेच्या 60 जागा असणाऱ्या अरुणाचलमध्ये भाजपकडून एकूण 54 जागांसाठी उमेदवारांचे नाव निश्चित करण्यात आले तर आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या 176 जागांसाठी 123 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. 

आंध्र प्रदेशातून एम. देवा राजू, येर्री स्वामी, जेएसव्ही प्रसाद, हणूमंतू उदय भास्कर यांच्यासह अनेकांची नावे यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत. तर अरुणाचल प्रदेशातून जम्बे ताशी, तेसरिंग ताशी, पेमा खंडू, फुर्पा तेसरिंग यांच्यासह अनेकांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com