Delhi Election : 'आप'पाठोपाठ भाजपचीही यादी जाहीर; केजरीवालांच्या विरोधात कोण?

BJP candidate list for Delhi Election 2020
BJP candidate list for Delhi Election 2020

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना तिकिटे देण्यात आली आहेत. दिल्लीत भाजपसमोर आपचे मोठे आव्हान आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने 2015 मध्ये आपटलेल्या 26 उमेदवारांना पुन्हा तिकिटे दिली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून कोण उभे राहणार, हे प्रश्‍न मात्र भाजपने अनुत्तरितच ठेवले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोर पटपडगंजमधून रवी नेगी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर, दिल्लीचे श्‍याम जाजू व तरुण चुग यांच्या उपस्थितीत आज भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. उर्वरित 13 उमेदवारही लवकरच जाहीर होतील, असे ते म्हणाले. दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान व संसद अधिवेशन पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत काल रात्री 8 पासून चार तास चाललेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली.

मोजकेच उमेदवार
आपमधून आलेल्या कपिल मिश्रा यांच्यासारख्या मोजक्‍याच चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मोजक्‍या चार महिला उमेदवारांत विभा गुप्ता, लता सोढी, शिखा राय व किरण वैद्य यांचा समावेश आहे. सर्वश्री गुप्ता (रोहिणी), जगदीश प्रधान (मुस्तफाबाद) व ओ. पी. शर्मा (विश्‍वासनगर) या तिन्ही आमदारांना आहे तेथेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र अकाली दल व इतर मित्रपक्षांना किती जागा देणार याबाबत भाजपने खुलासा केलेला नाही.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

मागच्या निवडणुकीत आपकडून हरलेल्या व नंतरही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 26 जणांना भाजपने तिकिटे दिली आहेत. भाजपचा दिल्ली जाहीरनामा पुढील आठवड्यात शहा किंवा नड्डा यांच्या हस्ते प्रकाशित केला जाईल. यासाठी भाजपने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. पक्षाला 11 लाखांहून जास्त दिल्लीकरांनी सूचना पाठविल्या आहेत.

दिल्ली चले मोदी के साथ ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वाखाली दिल्लीत यंदा भाजपचा बहुमताने विजय सुनिश्‍चित आहे. - श्‍याम जाजू, भाजप दिल्ली प्रभारी

भाजपचे प्रमुख उमेदवार
- विजेंद्र गुप्ता (रोहिणी)
- कपिल मिश्रा (मॉडेल टाउन)
- सुमनकुमार गुप्ता (चांदनी चौक)
- योगेंद्र चंदोलिया (करोल बाग)
- परवेश रतन (पटेलनगर)
- आशिष सूद (जनकपुरी)
- संजय सिंह (विकासपुरी)
- प्रद्युम्न राजपूत (द्वारका)
- सरदार आर. पी. सिंह (राजेंद्रनगर)
- शिखा राय (ग्रेटर कैलास)
- अनिल शर्मा (आर के पूरम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com