
'अमित शाह पंतप्रधान, मोदी गृहमंत्री', भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांची जीभ घसरली आहे. त्यांनी मोदींचा उल्लेख गृहमंत्री आणि अमित शाह यांचा उल्लेख पंतप्रधान केला आहे. त्यानंतर काहींनी त्यांच्यावर टीका केली, तर काहींनी खिल्ली उडवली. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री कोण? याचा विसर पडला काय? अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे. तसेच भाजपमध्ये भावी पंतप्रधान पदासाठी अंतर्गत चर्चा झाली असावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा: PM मोदी हे हिटलरला फॉलो करतात; संजय राऊत यांचा टोला
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आसाम काँग्रेसने ट्विट केला आहे. ''भाजपने अमित शाह यांची देशाचे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. जेव्हा सर्बानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी खासदार पल्लब लोचन दास यांनी अनेक वेळा कॅबिनेट मंत्री हेमंत बिस्वा यांचा आसामचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. आता भाजपने नरेंद्र मोदींऐवजी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अमित शाह यांना निवडले आहे का? अमित शहा यांच्या पंतप्रधानपदाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे का?'' असा सवाल काँग्रेसने केला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून वाटतंय की त्यांची जीभ घसरली नाहीतर ते भाजपने ठरवलेले वाक्य बोलत आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
भाजपकडून स्पष्टीकरण
हेमंत बिस्वा यांनी अमित शाह यांना पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गृहमंत्री (एचएम) म्हणून संबोधल्याबद्दल भाजपचे स्पष्टीकरण आले आहे. हेमंत बिस्वा यांची जीभ घसरली आणि ते चुकून असे बोलले, असे भाजपने म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार आणि मंगळवारी दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर जाऊन राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे उद्घाटन केले. यासोबतच बिस्वा यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हेमंत सहभागी झाले होते. शाह यांनी गुवाहाटी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचेही उद्घाटन केले. यावेळी हेमंत बिस्वा यांनी हे वक्तव्य केले होते.
Web Title: Bjp Cm Himanta Biswa Sarma Replace Pm Modi With Amit Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..