गोव्यात भाजपकडून सात नावे जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

राज्यातील एकूण 40 मतदारसंघापैकी भाजपने आतापर्यंत 36 उमेदवार निश्‍चित केले असून, नव्याने जाहीर केलेल्या यादीनुसार, विश्वजित राणे, सत्यविजय नाईक, सुनील देसाई, आर्थर, डिसिल्वा, विनय तारी, यांना संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मायेम व कॅनाकोना येथे पक्षाने बदल करीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव समोर न आणता सर्वांना संधी आहे, असे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते.

Web Title: bjp declares 7 candidates in goa