भाजपला गेल्या वर्षात 700 कोटींची देणगी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

भाजपला देणगी देणाऱ्यांत भारती समूह, हीरो मोटोकॉर्प, ज्युबिलेंट, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्ससह अन्य कॉर्पोरेट सेक्‍टरमधून देणगी मिळाली आहे. वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्याची माहिती राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते.

नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भाजप पक्षाला गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून सुमारे 700 कोटींची देणगी मिळाली आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले आहे. यानुसार सर्वाधिक देणगी टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्‍ट्रोल ट्रस्टने 356 कोटी दिली, तर भारतातील सर्वांत श्रीमंत ओळखली जाणारी विश्‍वस्त संस्था प्रुडेंट इलेक्‍ट्रोरल ट्रस्टने 54.25 कोटी रुपये दिले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

भाजपला देणगी देणाऱ्यांत भारती समूह, हीरो मोटोकॉर्प, ज्युबिलेंट, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्ससह अन्य कॉर्पोरेट सेक्‍टरमधून देणगी मिळाली आहे. वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्याची माहिती राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. ही देणगी धनादेश आणि ऑनलाइनच्या माध्यमातून दिली जाते. आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात निवडणूक बॉंडच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीचा समावेश केलेला नाही. कोणत्याही पक्षाला अशा प्रकारची देणगी वैयक्तिक, कंपनी आणि निवडणूक विश्‍वस्त संस्थेकडून मिळते.

कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी? जाणून घ्या 

निवडणूक आचारसंहितेनुसार दरवर्षी मिळणाऱ्या देणगीची माहिती देणे राजकीय पक्षाला बंधनकारक आहे. सध्याच्या नियमानुसार राजकीय पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनेचे नाव जाहीर करण्याची गरज नाही तसेच निवडणूक बॉंडचे विवरणदेखील दिले जात नाही.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP declares receiving donations over Rs 700 crore in FY 2018-19