प्रतिमा हननाचा भाजपचा प्रयत्न

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांच्या भावाच्या बॅंक खात्यांमधील कोट्यवधी रुपयांची रक्कम सक्तवसुली संचालनालयाने शोधून काढल्यानंतर आज मायवतींनी केंद्र सरकारवर जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे.

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांच्या भावाच्या बॅंक खात्यांमधील कोट्यवधी रुपयांची रक्कम सक्तवसुली संचालनालयाने शोधून काढल्यानंतर आज मायवतींनी केंद्र सरकारवर जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे.

बहुजन समाज पक्षाने सर्व नियमांचे पालन करूनच ही रक्कम बॅंकेमध्ये जमा केली होती. आमच्या पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक सरकारी यंत्रणेचा वापर करत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी येथे घाईघाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. बॅंकांमधील सर्व ठेवींचा आमच्याकडे हिशेब असून नोटाबंदीच्या आधी ही रक्कम गोळा करण्यात आली होती. ती आम्ही फेकून द्यायला हवी होती का? असा सवालही त्यांनी या वेळी केला.

भाजपची मानसिकता ही दलितविरोधी असून त्यांनी माध्यमांनाही मॅनेज करून आमच्या पक्षाच्या प्रतिमेचे हनन करायला सुरवात केली आहे. बहुजन समाज पक्षाने काही दिवसांपूर्वी सदस्यत्व नोंदणी मोहीम चालविली होती. हा सगळा पैसा त्यातून आला आहे. भाजपचा आमच्या पक्षावर आकस असून 2007 मध्येही केंद्रात त्यांचे सरकार असताना त्यांनी "ताज कॉरिडॉर'चा मुद्दा उकरून काढला होता. यानंतर भाजपने राज्यामध्ये बहुमताने सत्ता मिळवली होती. मोदी आणि केंद्र सरकारने नोटाबंदीसारखे आणखी काही निर्णय घेतल्यास आमच्या पक्षाला सत्तेत येणे अधिक सोपे होईल. आमचा सत्तेच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त केल्याबद्दल मी भाजपचे आभारच मानेल असेही त्यांनी नमूद केले.

मायावती एवढ्या हताश का झाल्या आहेत? त्यांना नेमकी कसली चिंता सतावते आहे?
- उदितराज, भाजप नेते

Web Title: BJP defaming BSP