भाजपने काँग्रेसचा पराभव केला : प्रकाश जावडेकर

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा इव्हीएम चांगले असते. मात्र, काँग्रेस कोठेही जिंकले नाही, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे आता इव्हीएम त्यांच्यासाठी वाईट आहे.

- प्रकाश जावडेकर, प्रभारी, कर्नाटक भाजप

नवी दिल्ली : काँग्रेसने भाजपचा पराभव केला असे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेसने भाजपचा नाहीतर भाजपने काँग्रेसचा पराभव केला, असे केंद्रीय मंत्री आणि कर्नाटक भाजपचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. काँग्रेसने आतापर्यंत अनेक कारस्थानं केली आहेत, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधींनी सांगितले होते, की काँग्रेसने भाजपचा पराभव केला. मात्र, काँग्रेसने भाजपचा नाहीतर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. कर्नाटकातील जागांच्या तुलनेने भाजपच जिंकला आहे. जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा इव्हीएम चांगले असते. मात्र, काँग्रेस कोठेही जिंकले नाही, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे आता इव्हीएम त्यांच्यासाठी वाईट आहे. आमचे काँग्रेसपेक्षा अधिक उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसने आतापर्यंत अनेक कारस्थानं केली. बोगस मतदान ओळखपत्र तयार केले. 

दरम्यान, जावडेकर यांनी जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, निवडणुकांपूर्वी कुमारस्वामी म्हणाले, की आम्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात टाकणार हे आमचे काम आहे. आता ते तसे करणार का, असेही ते म्हणाले. 

Web Title: BJP Defeat Congress Says Prakash Javadekar