Rafale Verdict : गांधींनी स्वत:चा फायदा पाहिला; आता माफी मागा : भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व्यवहारातील काँग्रेसचे दावे सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर आक्रमक झालेल्या मोदी सरकारने आज (शुक्रवार) लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 'या प्रकरणी निराधार आरोप करून जगभरात भारताची प्रतिमा मलीन केल्याबद्दल राहुल यांनी माफी मागावी', अशी आक्रमक मागणी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली. 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारातील कथित गैरव्यवहार हा प्रचाराचा मुद्दा बनविला होता. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोदी सरकारला या प्रकरणी घेरले होते. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. 

यानंतर लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. राजनाथसिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. 'राजकीय फायद्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षांनी देशातील जनतेची दिशाभूल केली. या आरोपांमुळे जगभरात भारताची प्रतिमा मलीन झाली. राहुल गांधी यांनी संसदेची आणि जनतेची माफी मागावी. 'हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डुबेंगे', असे त्यांना वाटले असावे', अशा शब्दांत राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. यामुळे लोकसभेचे कामकाज 17 डिसेंबरपर्यंत तहकूब करावे लागले. आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त विधेयके मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, तर राफेलसह अन्य मुद्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचे विरोधी पक्षांचे नियोजन आहे.

Web Title: BJP demands apology from Rahul Gandhi after SC dismisses petitions against Rafale Deal