गोव्यात भाजप राजकीय कोंडीत

अवित बगळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानी आज वेळ न दडवता भाजपचे कान टोचले. आधीच संघटनात्मक पातळीवरीस संदोपसुंदीमुळे भाजपचे नेते हैराण झाले असतानाच दुसरीकडे हे संकट उभे ठाकले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने त्यांच्या पदाचा ताबा सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपवावा या मागणीवर मगो ठाम आहे. मगोचे नेते सध्या या विषयावर जाहीर भाष्य करत नसले तरी ही मागणी सोडून दिलेली नाही असे सुतोवाच ते करत असतात. त्यांनी खाणींचा प्रश्न सोडविण्यासाठी 15 डिसेंबरची मु्दत भाजपला दिली आहे. त्यानंतर मगो काय करेल याचा अंदाज भाजपला नाही. केद्रीयमंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या राजकारणात कितपत लक्ष घालतील यावर या संदर्भातील राजकारण बऱ्यापैकी अवलंबून आहे.

दुसरीकडे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई  यांनी खाण अवलंबितांसाठी पक्ष काहीही करू शकतो असे आज जाहीर केले. कटरा- जम्मू येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन गोवा फॉरवर्डचे तीन्ही मंत्री चंढीगढमार्गे दिल्लीत पोचले आहेत. त्यांनी खाण अवलंबिताना पाठींबा देताना खाणी सुरु करणार की नाही हे स्पष्ट सांगा. लोकाना झुलवत ठेऊ नका असा सज्जड दम भाजपला दिला आहे.

खाण लोकमंचाची धुरा सांभाळणारे पुती गावकर हे एकेकाळी परीवारातील कामागार संघटनेचे नेते होते. तेही आता भाजपसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले आहेत. गेल्या निवड़णुकीवेळी भाजपविरोधी भूमिका घेणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंचाची रितसर नेतृत्व स्वीकारले आहे. दक्षिण गोव्यात रमेश तवडकर यांनी लोकसंग्रहावर भर दिला आहे. या साऱ्या आघाड्यांवर भाजपला लढावे लागणार आहे. त्यातच वाढत्या टिकेमुळे घटत्या लोकप्रियतेचेही आव्हान आहे.

Web Title: BJP face political problem in Goa