सोशल मीडिया आता भाजपवर उलटला; भाजप ट्रोल

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घौडदौडीला लगाम बसत असतानाच नेटकऱ्यांनी आता भाजपला ट्रोल करायला सुरवात केली आहे.

पुणे : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घौडदौडीला लगाम बसत असतानाच नेटकऱ्यांनी आता भाजपला ट्रोल करायला सुरवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपचे सरकार असून काँग्रेसने चुरशीची लढत दिली. काँग्रेस या तीन राज्यांमध्ये सध्या आघाडीवर आहे.

भाजपने या राज्यात जोरदार प्रचार केला होता. तरीही त्यांच्या हातातून विजय निसटताना दिसत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच राजस्थनच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व सर्व भाजप पक्षच ट्रोल होताना दिसतोय. त्यामुळे यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांचे लक्ष आता भाजपला ट्रोल करण्याकडे आहे असे दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही मिम्स - 

आखिर पप्पु पास हो गया...

और गप्पु (बोलबच्चन) फेल हो गया...

मोदीजी आप पुरानी गांधी नोट बंद करने में सफल हुये...

लेकीन गांधी वोट बंद करणा आपके बस कि बात नही...

राजस्थान, एम पी,छत्तीसगड,तेलंगणा, मिळवलेल्या यशा बद्दल राहुल गांधी यांना शुभेच्छा

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: BJP gets troll on Social Media for election