भाजपशासित 'या' तीन राज्यांत अॅट्रॉसिटीचा सुधारित कायदा लागू

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अॅट्रॉसिटीचा सुधारित कायदा लागू करण्यात आल्याने काही दलित संघटनांनी याचा विरोध केला असून, अॅट्रॉसिटीचा कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही बदल सुचवले. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली. मात्र, असे असताना भाजपशासित तीन राज्यांमध्ये अॅट्रॉसिटीबाबतचा सुधारित कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अॅट्रॉसिटीचा सुधारित कायदा लागू करण्यात आला आहे.

Supreme Courts

20 मार्चला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हिमाचल प्रदेश सरकारने याबाबत पत्रक जारी केले असून, पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. 

दरम्यान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अॅट्रॉसिटीचा सुधारित कायदा लागू करण्यात आल्याने काही दलित संघटनांनी याचा विरोध केला असून, अॅट्रॉसिटीचा कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP Government three States Enforce New SC ST Law