भाजपने पराभव मान्य केला : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

आमचा पक्ष तिकीटवाटपासाठी सर्व समाज विचारसरणीचा अवलंब करेल. "बसप'चा मूलाधार हा दलित असला तरीसुद्धा आमच्या पक्षाने उच्चवर्णीयांनाही सर्वाधिक तिकिटे दिली असल्याचे त्यांनी नमूद केले

लखनौ  - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभव मान्य केला असून, आमचा पक्षदेखील निवडणुकीसाठी अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी म्हटले आहे.

दरम्यान राजकारणासाठी धर्म आणि जातीचा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या मज्जावास मायावतींनी विरोध दर्शविला आहे. आमचा पक्ष तिकीटवाटपासाठी सर्व समाज विचारसरणीचा अवलंब करेल. "बसप'चा मूलाधार हा दलित असला तरीसुद्धा आमच्या पक्षाने उच्चवर्णीयांनाही सर्वाधिक तिकिटे दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: BJP has accepted defeat, says Mayawati