भाजपने आत्मपरीक्षण करावे  : विजय सरदेसाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल पाहता भाजपने आत्मपरीक्षण करावे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले. खाण प्रश्न सोडवण्यास त्यांच्यात इच्छाशक्ती नसल्यास पाच राज्यांतील निवडणूक निकालांकडे पाहून त्यांनी अशी इच्छाशक्ती निर्माण करावी. प्रस्थापितांविरुद्धची लाट या निडणुकीत दिसून आली. राजकारणात हे साहजिक आहे. पण, भाजपने जनतेच्या भावना जाणून घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. 

मडगाव ः  गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारमधील ज्येष्ठ सहकारी पक्ष असलेल्या भाजपला दिला आहे. 

दिल्ली येथे रामलीला मैदानावर गोव्याच्या खाण अवलंबितांनी आजपासून सुरु केलेल्या आंदोलनात सरदेसाई यांच्यासह ग्रामीणविकास मंत्री जयेश साळगावकर व जलसंपदा मंत्री विनोद पालयेकर हे गोवा फाॅरवर्डचे नेते उपस्थित होते. भाजपकडे केवळ नाट्यमयता आहे व कृतीचा अभाव आहे, अशी टिकाही त्यांनी केली. 

खाण प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन खाण अवलंबितांना झुलवत ठेवण्यात आले आहे. भाजपचा एक नेता केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व नेत्यांशी समन्वय साधून हा प्रश्न सोडवला पाहिजे. कायदा किवा वटहुकूम नाव काहीही द्या, पण तोडगा काढा. खाण अवलंबितांना फक्त ताऱखा देऊ नका व त्यांना गृहीत धरू नका, असे सरदेसाई यांनी सांगितले. 

हा प्रश्न सुटणार की नाही ते स्पष्टपणे सांगा. प्रश्न सोडवण्यास होत नसेल तर खाण अवलंबितांनी काय करावे तेही सांगा, त्यांची दिशाभूल करू नका. हा प्रश्न सरकार सोडवू शकत नसेल तर हे सरकार गोमंतकियांवर अन्याय करत असून अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 

खाण प्रश्न सोडवण्यास सरकारला वेळेची मुदत देत नसलो तरी `समझनेवाले को इशारा काफी है` अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला. `गोव्यातील खाण व्यवसाय गोवेकरांच्याच हाती असावा यासाठी गोवा फाॅरवर्ड काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे काय ते तुम्हाला ठाऊक आहे`, अशा शब्दात त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिकेचेही संकेत दिले. सरदेसाई यांच्यासह साळगावकर व पालयेकर हे गोवा फाॅरवर्ड पक्षाचे नेते गोव्याच्या भाजप्रणित युती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत. 

भाजपने आत्मपरीक्षण करावे - विजय
पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल पाहता भाजपने आत्मपरीक्षण करावे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले. खाण प्रश्न सोडवण्यास त्यांच्यात इच्छाशक्ती नसल्यास पाच राज्यांतील निवडणूक निकालांकडे पाहून त्यांनी अशी इच्छाशक्ती निर्माण करावी. प्रस्थापितांविरुद्धची लाट या निडणुकीत दिसून आली. राजकारणात हे साहजिक आहे. पण, भाजपने जनतेच्या भावना जाणून घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP has done self-examination said Vijay Sardesai