मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय भाजपच्या बहुमताच्या गप्पा - मायावती

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

बालिया (उत्तर प्रदेश) - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (रविवार) भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नावही घोषित केले नाही; तरीही ते बहुमताबबत बोलत आहेत, अशी टीका मायावती यांनी केली.

बालिया (उत्तर प्रदेश) - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (रविवार) भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नावही घोषित केले नाही; तरीही ते बहुमताबबत बोलत आहेत, अशी टीका मायावती यांनी केली.

येथील प्रचारसभेत मायावती म्हणाल्या, "जर भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच जाहीर केला नसेल, तर भाजप जिंकेल कसा?' गोरखपूर येथील सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "राज्यात चार वेळा माझे सरकार आले आहे. हिंदूंचा सण असो वा मुस्लिमांचा आम्ही कोणताही भेदभाव केला नाही. मोदींना मी सांगू इच्छिते की, हिंदू प्रथेनुसार हिंदूंच्या स्मशानभूमी गावात नसतात. त्या गावापासून तीन किलोमीटर दूर असतात. ते म्हणतात की आम्ही गावागावात मुसलमानांसाठी स्मशानभूमी उभ्या केल्याने ते आता हिंदूंसाठी स्मशानभूमी तयार करणार.' समाजवादी पक्षावर निशाणा साधत मायावती म्हणाल्या, "बहुजन समाज पक्षाच्या लोककल्याणाच्या विविध योजना नाव बदलून समाजवादी पक्षाने कॉपी केल्या. त्यापैकी महत्त्वाचे धोरण म्हणजे समाजवादी निवृत्तीवेतन योजना. ती मूळात महा माया गरीब आर्थिक मदत योजना होती.'

उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. अकरा जिल्ह्यातील एकूण 51 मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यामध्ये बलरामपूर, गोंदा, फैझाबाद, आंबेडकर नगर, बहारिच, श्रावस्ती, सिद्धार्थ नगर, बस्ती, संत कबीर नगर, अमेठी आणि सुलतानपूर या अकरा जिल्ह्यांचा मतदारसंघांचाही समावेश आहे.

Web Title: BJP has not projects CM candidate; and talks about sweeping UP polls : Mayawati