पदयात्रांचा अहवाल द्या! पक्षश्रेष्ठींच्या भाजप खासदारांना सूचना

वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचा सविस्तर अहवाल आठवडाभरात देण्याच्या सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या आहेत. भाजप संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत ही सूचना देण्यात आली. 

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचा सविस्तर अहवाल आठवडाभरात देण्याच्या सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या आहेत. भाजप संसदीय पक्षाची बैठक आज झाली. तीत ही सूचना देण्यात आली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या सुमारे 400 खासदारांपैकी 250 खासदारांनीच याबाबतचे अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविले असून, अनेक अहवाल त्रोटक आहेत. संसदीय ग्रंथालय इमारतीत झालेल्या या अधिवेशनातील पहिल्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह सत्तारूढ मंत्री व खासदार हजर होते. 

आघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून सात नेते राहणार उपस्थित

या बैठकीत अर्थसंकल्पी व हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या विदेश दौऱ्यांचा तपशील खासदारांसमोर सांगण्यात आला. त्यातील कोणता भाग मतदारसंघांत प्रचारासाठी वापरायचा, हेही सूचकपणे सांगितले गेल्याचे कळते. मागच्या दोन महिन्यांत अमेरिकेतील "हाऊडी मोदी' कार्यक्रमासह अनेक जागतिक मंचांवर त्यांनी हजेरी लावली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इंग्रजीत या भेटींचा लेखाजोखा आज मांडला. व्यापार कराराबाबतच्या आरसीईपी जाहीरनाम्यातून भारताने काढता पाय घेतला तो केवळ राष्ट्रहितासाठी, याचीही मांडणी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी या बैठकीत केली. 

पुणे : ...जेव्हा पूरग्रस्तांच्या भावना मांडताना नगरसेविकेला रडू कोसळते (व्हिडिओ

खासदारांचा काणाडोळा 
बैठकीनंतर बोलताना पक्षसूत्रांनी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या यात्रांबाबतच्या सूचनेची माहिती दिली. पंतप्रधानांच्या आदेशानुसार भाजप खासदार, आमदार, केंद्र व राज्यांचे मंत्री व पदाधिकारी यांनी 2 ते 31 ऑक्‍टोबर या काळात प्रत्येकी 150 किलोमीटरच्या पदयात्रा पूर्ण करण्याचे नियोजन होते. या यात्रांचा विस्तृत अहवाल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत दिल्लीला पाठवा, अशाही सूचना होत्या. मात्र, पक्षाच्या सर्व खासदारांनी त्या पूर्ण पाळलेल्या नसल्याचे दिसून आले. लवकरात लवकर हे अहवाल पाठवा, अशी सक्त सूचना आजच्या बैठकीत खासदारांना दिली गेल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP high command wants rally report from MP