सत्तेसाठी भाजपचा गोव्यात घोडेबाजार : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

गोव्यामध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करेल, असा विश्‍वास व्यक्त करत काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी भारतीय जनता पक्ष गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी घोडेबाजार करण्यात व्यग्र असल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली - गोव्यामध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करेल, असा विश्‍वास व्यक्त करत काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे राज्यप्रभारी दिग्विजयसिंह यांनी भारतीय जनता पक्ष गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी घोडेबाजार करण्यात व्यग्र असल्याची टीका केली आहे.

गोवा विधानसभेच्या 40 जागांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी केलेल्या पक्षांना मिळून एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले आणि 10 जागा अन्य पक्षांना मिळाल्या. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना दिग्विजयसिंह म्हणाले, "त्यांचा (भाजप) पराभव झाला आहे आणि ते घोडेबाजार करत आहेत. हा नैतिक पक्ष आहे? मिठाईप्रमाणे ते मंत्रालये वाटण्याचे आश्‍वासन देत आहेत. आम्ही भाजपेत्तर पक्षांच्या संपर्कात आहोत. आम्हाला विश्‍वास आहे की आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे.'

दिग्विजयसिंह यांच्याकडे गोव्या काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. आज काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी सिंह यांच्यासह काँग्रेसचे सचिव डॉ. चेल्लाकुमार हे शनिवारपासूनच गोव्यात तळ ठोकून आहेत.

Web Title: BJP indulging in horse-trading for govt. formation in Goa : Cong