esakal | भाजप हा विरोधकांपेक्षा देणग्या मिळण्याच्या बाबतीत कित्येक पटीने पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

भाजप हा विरोधकांपेक्षा देणग्या मिळण्याच्या बाबतीत कित्येक पटीने पुढे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रासह किमान १६ राज्यांमध्ये सत्तारूढ असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला (BJP) मागच्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ७५० कोटी रुपयांच्या देणग्या (Donation) मिळाल्या. सलग सातव्या वर्षी भाजप हा विरोधकांपेक्षा देणग्या मिळण्याच्या बाबतीत कित्येक पटीने पुढे आहे. (BJP is Many Times ahead Opposition in Terms of Receiving Donations)

निवडणूक आयोगाला नुकत्याच सादर झालेल्या आकडेवारीवरून एका संकेतस्थळाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार २०१९-२० या वर्षात भाजपला साडेसातशे कोटी रुपयांच्या देणग्या विविध उद्योगसमूह आणि व्यक्तींकडून मिळाल्या. हा आकडा काँग्रेसपेक्षा (१३९ कोटी) तब्बल पाच पटींनी जास्त आहे. सलग सातव्या वर्षी भाजप देणग्यांच्या बाबतीत देशातील ‘टॉप’चा पक्ष ठरला आहे. आयोगाकडे भाजपने सादर केलेल्या देणग्यांमध्ये केवळ व्यक्ती आणि कंपन्या यांच्याकडून आलेल्या रकमांचा समावेश आहे. ‘इलेक्टोरल बॉण्ड’द्वारे मिळालेल्या देणग्या भाजपने अजून आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत.

हेही वाचा: देशात शंभरपैकी फक्त 55 नागरिकांकडेच इंटरनेट कनेक्शन - नीती आयोग

भाजपच्या प्रमुख देणगीदारांमध्ये भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांचा ज्युपिटर कॅपिटल समूह, रिअल इस्टेट क्षेत्रातील बी जी शिर्के टेक्नॉलॉजी, आयटीसी ग्रुप, मायक्रोटेक डेव्हलपर्स, द प्रुडंट आणि जनकल्याण हे इलेक्टोरल ट्रस्ट आदींचा समावेश आहे. किमान १४ अग्रगण्य शैक्षणिक संस्थांनीही भाजपला सढळ हस्ते देणगीदान केले आहे. दिल्लीतील मेवार विद्यापीठ, कृष्णा अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, जी. डी. गोयंका इंटरनॅशनल स्कूल, रोहतक हरियाना येथील पठानिया पब्लिक स्कूल, कोटा येथील ॲलन करिअर संस्था आदींनी एका वर्षात प्रत्येकी दोन लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत त्याच्या देणग्या भाजपला दिले आहेत.

राजकीय नेत्यांमध्ये, खासदार चंद्रशेखर यांनी व्यक्तिगतरीत्या दोन कोटींची देणगी भाजपला दिली आहे. याशिवाय हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू, खासदार किरण खेर, मणिपाल ग्लोबल एज्युकेशन संस्थेचे मोहनदास पै आदींनी ७ लाखांपासून दोन कोटीपर्यंतच्या देणग्या भाजपला दिल्या आहेत.

हेही वाचा: 'दारिद्र्य कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन करा'; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लिमांना आवाहन

मिळालेल्या देणग्या (आकडे कोटी रुपयांत)

७५० - भाजप

१३९ - काँग्रेस

५९ - राष्ट्रवादी काँग्रेस

२० - माकप

८ - तृणमूल

१.९० - भाकप