भाजपची पंजाब आणि गोव्यासाठी पहिली यादी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठीच्या तयारीला भाजपने अंतिम स्वरुप द्यायला सुरवात केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (गुरुवार) प्रसिद्ध केली. 

पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी बुधवारी रात्री बैठक घेतली. भाजपचे नेते जे.पी. नड्डा यांनी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली. पंजाबच्या पहिल्या यादीत 17, तर गोव्याच्या यादीत 29 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. 

5 आमदारांना पुन्हा संधी
पंजाबमध्ये भाजपची अकाली दलासोबत युती आहे. भाजप 117 पैकी 23 जागांवर निवडणुका लढवते, तर अकाली दल 97 जागांवर निवडणुका लढवते. सध्या पंजाब विधानसभेत भाजपचे 11 विद्यमान आमदार आहेत. त्यामध्ये पक्षातून बाहेर पडलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्या प्तनी नवज्योत कौर या पूर्व अमृतसरमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने 17 जागांपैकी 5 जागांवर विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 
 
Web Title: bjp issues first list of candidates for punjab and goa