गुजरातमध्ये भाजपचे शतक

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपकडे 99 जागा होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या या विजयामुळे भाजपचे शतक झाले आहे. त्यामुळे गुजरातचे विधानसभेतील संख्याबळ आता 99 वरून 100 झाले आहे. 

भाजपचे उमेदवार कुंजरजी बावलिया यांनी काँग्रेसचे उमेदवार अवसर नाकिया यांचा 19,979 मतांनी पराभव केला. बावलिया हे राजकोट जिल्ह्यातील जसदणची जागा जिंकण्यास यशस्वी झाले आहेत. विधानसभेच्या 182 जागा असणाऱ्या गुजरातमध्ये भाजपचे 100 आमदार असून, काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊन 76 झाले आहे. 

बावलिया यांनी 2017 मध्ये जसदण विधानसभेची जागा काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि विधानसभेच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये भाजपचा विजय झाला.

Web Title: BJP Kunvarji Bavalia wins by over 19000 votes in Gujrat