संजय राऊत गजनी झालेत; भाजपच्या 'या' नेत्याने केली टीका

वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही युतीने सत्ता स्थापन न केल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी झाले आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते जी वी एल नरसिम्हा राव यांनी केली आहे.

नवी दिल्ली : युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही युतीने सत्ता स्थापन न केल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी झाले आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते जी वी एल नरसिम्हा राव यांनी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसनेने सामनातून केलेल्या टीकेनंतर आता भाजपनं शिवसेनेला धारेवर धरलं असून आम्ही सामना वाचत नाही. जे त्यात लिहितात तेच ते वाचतात, अशी टीकाही करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

मनसे घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट 

भाजपला मोठा धक्का; 23 पालिका काँग्रेसच्या 'हाता'त

आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही घराचा एक भाग आहात, असं कसं म्हणू शकता? दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते काही वेगळं वक्तव्य करतात आणि आज काही वेगळं वक्तव्य करत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आज काल गजनी झाले आहेत, अशी टीका राव यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही उत्तम सरकार देण्याचं आश्वासन दिलं होतं. जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. जे पक्ष राजकारणासाठी सत्तेच्या शोधात होते, तेच विखुरल्यासारखे दिसत असल्याचेही राव म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leadear Gvl Narsimha Rao Criticize Shiv Sena MP Sanjay Raut