देशाच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगा!

namste-trump
namste-trump

नवी दिल्ली - भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याविषयी काँग्रेस नाखूष का आहे, असा प्रश्‍न भाजपने शनिवारी केला. देशाच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगा, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. 

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अहमदाबाद येथे आयोजित केलेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम यावर्षी अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांना समर्थन देण्यासाठी आयोजित केला आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. तसेच ट्रम्प यांच्या स्वागताला ७० लाख लोक उपस्‍थित राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने ट्रम्प हे भगवान श्रीराम आहेत का? असा सवाल काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नुकताच केला होता. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याच्या मुद्दा उपस्थित केला करत सरकारवर टीका केली आहे..

यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. आज पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ट्रम्प यांचा दौरा हा भारत-अमेरिका संबंधांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. जगातील सर्वांत मोठ्या आणि जुन्या लोकशाही देशांची ही भेट आहे. अमेरिकेच्या हेतूबद्दल काँग्रेसने काळजी करू नये, असा पात्रा म्हणाले. 

संबंध दृढ करण्याची संधी
ह्युस्टन -
 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेट म्हणजे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, सामरिक संबंध आणि भारत-प्रशांत मार्ग खुला करण्याची बांधीलकी दृढ करण्याची संधी आहे, अशी अपेक्षा अमेरिकेत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या आयोजक समितीने व्यक्त केली आहे. ट्रम्प व मोदी यांचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा संयुक्‍त कार्यक्रम जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे मैदान असलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये उद्या होणार आहे. या कार्यक्रमाच्या संयोजकांना ‘हाऊडी मोदी’च्या चमूने शुभेच्छा दिल्या आहेत. 

काँग्रेसला तिच्या स्वतःच्या बुडत्या भवितव्याची चिंता सतावत आहे. या पक्षाचे नेते हे रडकी बाळे असल्यासारखे वागत आहेत.
- संबित पात्रा, भाजपचे प्रवक्ते

ताजमहाल भेटीत मोदींची अनुपस्थिती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आल्यावर आग्रा येथे ताजमहालाला कुटुंबासह भेट देणार आहेत. मात्र त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासोबत नसतील, असे शनिवारी सांगण्यात आले. अहमदाबादमधील कार्यक्रमानंतर ट्रम्प हे आग्र्याला जाणार असून ताजमहालाला भेट देणार आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला ताजमहालसारखे ऐतिहासिक स्थळ पाहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी ही भेट आखली आहे. त्यामुळे त्या काळात कोणताही अधिकृत कार्यक्रमाचे नियोजन भारताने केले नसून या भेटीत त्यांच्याबरोबर कोणीही वरिष्ठ अधिकारी नसेल, असेही सांगण्यात आले.

मोटेरा स्टेडियमची सहा फुटी प्रतिकृती 
अहमदाबाद : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर मणिनगर येथील कुमकुम मंदिरात मोटेरा स्टेडियमची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. सुमारे सहा फूट उंच आणि सहा फूट रुंदीची ही प्रतिकृती तयार करण्यासाठी ८० तास लागले. स्वामी विवेकानंद यांनी १८९३मध्ये शिकागोला भेट दिली होती. त्या घटनेची आठवण म्हणून या प्रतिकृतीत विवेकानंद यांचे छायाचित्र उभारले आहे, अशी माहिती साधू प्रेमवत्सल दासजी यांनी दिली. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांचे स्वागत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com