भन्साळींना मारणाऱ्यास भाजप नेत्याचा इनाम 10 हजार

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

हौसंगाबाद - चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना जोडे मारणाऱ्यास प्रत्येक जोड्यासाठी दहा हजार रुपये बक्षिस म्हणून देण्याची घोषणा मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने केली आहे.

अखिलेश खंडेलवाल या मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने फेसबुकवरून हे आवाहन केले आहे. भन्साळीसारखे लोक आपल्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  ऐतिहासिक तथ्यांची मडतोड करणाऱया शक्तींना लगाम लावण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आपण शांत राहुन चालणार नाही. त्यांना वेळीच रोखले पाहीजे, असे त्याने लिहिले आहे. 

संजय लिला भन्साळींवर त्यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करत असल्याचा आरोप होत आहे. तीन दिवसांपूर्वी राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जयपूरमध्ये भन्साळींवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर चित्रपटाचे शुटींग थांबवावे लागले होते. या हल्ल्याचा सर्व स्तरातुन निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान हिंदुत्त्ववादी नैतिकतेच्या नावाखाली दडपशाही करत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. अखिलेश खंडेलवालवर त्याच्या प्रक्षोभक लिखाणाबद्दल कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

Web Title: BJP leader announces Rs10000 for slapping Bhansali